🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उतीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यात एका तरुणाने ६ जून रोजी गळफास घेत आत्महत्या केली होती. स्वप्नील लोणकर (Swapnil Lonkar) असे या तरुणाचे नाव आहे. परीक्षा उतीर्ण होऊन दीड वर्षे झाले तरी त्याची मुलाखत झाली नाही, या नैराश्यातून अखेर त्याने आत्महत्या केली होती. आता त्याचे मुलाखतीच्या यादीत नाव आले आहे. यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
याबाबत चित्रा वाघ ट्विट करत म्हणाल्या, ‘ही तर सरकार प्रेरित हत्या! MPSC परीक्षा पास होऊनही नोकरी मिळत नसल्यानं आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरचं ६ महिन्यानंतर मुलाखतीच्या यादीत नाव आलंय. स्वप्नील प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा बळी ठरल्याचं खुद्द सरकारनं कबूल केलं. या खुनी सरकारवरच कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा.’ असे ट्विट करत चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
ही तर सरकार प्रेरित हत्या !#MPSC परीक्षा पास होऊनही नोकरी मिळत नसल्यानं आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरचं
६ महिन्यानंतर मुलाखतीच्या यादीत नाव आलंय..स्वप्नील प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा बळी ठरल्याचं खुद्द सरकारनं कबूल केलं..
या खुनी सरकारवरच कलम 302 चा गुन्हा दाखल करावा..
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 14, 2021
पीडित तरुण स्वप्नील लोणकरने पुण्यातील फुरसंगी येथे गळफास लावून आत्महत्या केली होती. २०१९ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या परीक्षेचा निकाल १९ जून २०२० रोजी लागला. त्यानंतर १ वर्षे उलटूनही मुलाखती घेतल्या नाही, या नैराश्यातून स्वप्नीलने आत्महत्या केली होती. एमपीएससीने नुकतीच मुलाखतीसाठी यादी जाहीर केली आहे. त्यात स्वप्नीलचे नाव आल्याने प्रचंड टीका होत आहे. एमपीएससीनेच माझ्या मुलाचा बळी घेतला, असा आरोप स्वप्नीलच्या वडीलांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शिवरायांचा अवमान करणारी ‘ही’ भाजपाची छिंदम प्रवृत्ती’, तात्काळ माफी मागा; कॉंग्रेसची मागणी
- ‘अंगावर राख फासून, भगवी वस्त्रे परिधान करून, राज्यकर्त्यांना मंदिरे उभारता येतील पण…’
- घटस्फोटानंतर १६ वर्षांनी लहान असलेल्या अमृताशी बांधली गाठ; जाणून घ्या कोण आहे ‘तो’
- ‘सचिन वाझे, मुकेश अंबानी अन मुख्यमंत्री’… काय म्हणाले राज ठाकरे..?
- 2 दिवस उशिरा का होईना पवार साहेबांना बड्डे गिफ्ट मिळालं; राणेंचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
