नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात फलंदाजी करताना जखमी झालेला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आता पूर्णपणे फिट असून, ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १४ व्या पर्वात पंजाब किंग्सकडून खेळण्यास सज्ज आहे.
ॲडिलेडच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याचा आखूड टप्प्याचा चेंडू मनगटावर आदळल्याने शमी संपूर्ण दौऱ्यातून बाहेर पडला. त्याने लगेच भारतात परतून बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार घेतले. आता तो पूर्णपणे फिट आहे.
तो म्हणाला, ‘फलंदाजी करतेवेळी जखमी होणे दुर्दैवी ठरले. कारण दीर्घकाळापासून मला फिटनेसची कुठलीही समस्या नव्हती. तथापि आपण यात काहीच करू शकत नाही. जखमा हा खेळाचा एक भाग आहे. मी नेहमी सकारात्मक पैलूंवर लक्ष देतो.’
दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल २०२१ च्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. कोरोना प्रादुर्भावानंतर आयपीएलचे भारतात पुनरागमन होत आहे. ९ एप्रिलला पहिला सामना तर अंतिम सामना हा ३० मे रोजी होणार आहे. मात्र, यंदाही स्पर्धा विनाप्रेक्षकच पार पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ये बॅट हमको दे, दे ठाकूर ; शार्दुलच्या शानदार षटकारावर स्टोक्स फिदा
- ‘रिषभ जर असाच खेळत राहिला तर तो ‘या’ दोघांनाही मागे टाकेल’
- शार्दुल-भुवनेश्वरला पुरस्कार न मिळाल्याने विराट भडकला, म्हणाला…
- पोटात दुखू लागल्याने खा.शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला कोव्हिड वॉर रुमचा आढावा

