Share

इंग्लंड दौऱ्यापूर्वी कपिल देव यांचा ऋषभ पंतला मोलाचा सल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतातील कोरोना परिस्थीतीमुळे आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. ही स्पर्धा अर्ध्यातच स्थगित झाल्याने अनेक क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला. यानंतर क्रिकेट रसिकांचे लक्ष हे जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या आंतिम सामन्याकडे लागले.

भारत आणि इंग्लंड यांच्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. या वर्षाच्या सुरुवातीला विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडला घरच्या मैदानावर पराभूत केले.  4 सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियाने 3-1 ने जिंकली. विराट ब्रिगेडला हा फॉर्म इंग्लंडमध्येही सुरू ठेवायचा आहे. आता टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि इंग्लंड विरुद्ध पाच टेस्टची मालिका होणार आहे.

आगामी इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाला ऋषभ पंतकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या दौऱ्यापूर्वी महान क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे माजी वर्ल्ड कप विजेते कॅप्टन कपिल देव यांनी ऋषभ पंतला एक मोलाचा सल्ला दिला आहे.’ऋषभ पंतने इंग्लंड दौऱ्यात पंतला आक्रमकतेबरोबरच सावध खेळ खेळण्याची आवश्यकता आहे. त्याने जर तसे केले तर त्याला दीर्घकाळ बॅटींग करता येईल, असा सल्ला कपिल देव यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!