मुंबई – खासदार संभाजीराजे छत्रपती हे नेहमी जनतेमध्ये थेट मिसळत असतात. त्याच्या मनमोकळ्या स्वभावामुळे देखील देखील ते बऱ्याचदा चर्चेत असतात. जनतेच्या अनेक सुखदुखात ते सहभागी होत असतात. असाच एक प्रसंग काल घडला असून सोशल मिडीयावर याची बरीच चर्चा सुरु आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या संभाजीराजे यांनी निकाली काढण्याचा निश्चय केला आहे. या निमित्ताने ते विविध पक्षातील नेते मंडळींच्या गाठीभेटी घेत आहेत. काल ते मुंबईत होते त्यावेळी ते एका होतेमध्ये थांबले होते. त्यावेळी त्या ठिकाणी दिनेश कदम हा कोकणातला मुलगा त्यांना भेटला. तो मुंबईतच हॉटेल मध्ये काम करतो. त्याचा वाढदिवस आहे, असे संभाजीराजे यांना कळताच केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला व त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
आपला वाढदिवस अशा पद्धतीने साजरा होईल असे त्याला स्वप्नात देखील वाटले नसे. संभाजीराजे यांनी दाखवलेल्या दिलदारपणामुळे तो युवक चांगलाच भारावून गेला. त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहू लागला असे फोटोजमधून दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादला मोठा दिलासा; तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट
- लॉकडाऊनमुळे रोजगार गेला, हप्ते भरायला पैसे नाही; शेवटी गळफास लाऊन केली आत्महत्या!
- इंग्लंड दौऱ्याआधी जडेजाने शेअर केला धोनीसोबतचा जुना फोटो; आठवणीला दिला उजाळा
- बीडमध्ये ७०३ नवे रुग्ण तर ८८७ रुग्ण कोरोनामुक्त!
- …तर काँग्रेसला योग्य तो विचार करावाच लागेल, नितीन राऊत आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
