मुंबई : पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्यावर सरकारमधून काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु असतानाच आता महाविकास आघाडीतील वाद आणखी वाढू लागला आहे. यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही असला तरी त्यामुळे महाविकासआघाडी सरकारला कुठलाही धोका निर्माण होणार नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी केले. हे सरकार पाच वर्षे चालेल. हा वैचारिक वाद चर्चेच्या माध्यमातूनच सोडवला जाईल, त्याचा सरकारशी कोणताही संबंध नाही, असे राऊत यांनी सांगितले.
तर दुसरीकडे कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावर महाविकास आघाडीने दुर्लक्ष केल्याचा आरोप नितीन राऊत यांनी केला आहे. महाविकासआघाडीचे सरकार हे कॉमन मिनिमम प्रोगामवर चालते. दीड महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दलित आणि मागासवर्गीयांच्या हक्कांविषयी अवगत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहले होते. या पत्रात सोनिया गांधी यांनी तीन महिन्यातून एकदा महाविकासआघाडीच्या कोर कमिटीची बैठक घेण्याविषयीही सुचविले होते.
मात्र, त्या पत्राच्या अनुषंगाने आतापर्यंत महाविकासआघाडीच्या कोर कमिटीची एक बैठक आयोजित झाली पाहिजे होती. अशाप्रकारे महाविकासआघाडीचा भाग असलेल्या एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची दखल घेतली जात नसेल तर काँग्रेसला योग्य तो विचार करावा लागेल, असे नितीन राऊत यांनी म्हटले.
मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणासाठी राज्य मंत्रिमंडळाची जी उपसमिती तयार करण्यात आली त्या समितीची एकच बैठक झाली. त्या बैठकीत जो निर्णय झाला त्यालाच काळीमा फासून 7 मे रोजी अधिसूचना काढण्यात आली. ही अधिसूचना काढतान उपसमितीला विश्वासात घेण्यात आले नाही, अशी खंतही राऊत यांनी बोलून दाखविली.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबादला मोठा दिलासा; तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट
- लॉकडाऊनमुळे रोजगार गेला, हप्ते भरायला पैसे नाही; शेवटी गळफास लाऊन केली आत्महत्या!
- इंग्लंड दौऱ्याआधी जडेजाने शेअर केला धोनीसोबतचा जुना फोटो; आठवणीला दिला उजाळा
- बीडमध्ये ७०३ नवे रुग्ण तर ८८७ रुग्ण कोरोनामुक्त!
- मराठा आरक्षण : संभाजीराजे घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

