Share

पंतची आयपीएल खेळायची लायकीच नव्हती, दिग्गज खेळाडूंनी उठवली टीकेची झोड

Published On: 

नवी दिल्ली- दिल्लीच्या यंदाच्या खराब कामगिरीचं कारण ठरलं ते त्यांचा मॅच विनर ऋषभ पंतचा खराब फॉर्म.. ऑस्ट्रेलियाचे माजी ऑलराऊंडर आणि दिग्गज प्रशिक्षक टॉम मूडी यांनी ऋषभ पंत याच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. क्रिकइन्फोशी बोलत असताना टॉम मूडी म्हणाले की यंदाच्या वर्षी ऋषभ पंत आयपीएल खेळण्यासाठी लायकच नव्हता.

दरम्यान आयपीएलदरम्यानच दुखापतही झाली आणि ही दुखापतंही त्याच्या खराब फिटनेसमुळे झाली. लॉकडाऊनच्या काळात सर्वांना आव्हानांचा सामना करावा लागलाय. मात्र हे कारण असू शकत नाही, असंही मूडी यांनी सांगितलंय.पंतने कोहलीकडून फिटनेसबाबत शिकावं. पंत फक्त शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही ट्रॅक वरुन उतरलाय. आणि खराब फिटनेस हेच त्याच्या दुखापतीचं कारण असल्याचं मूडींनी सांगितलंय.

दुसऱ्या बाजूला ऋषभ पंत व पृथ्वी शॉ यांनी मोटारींच्या जाहिराती करण्यापेक्षा आपल्या कामगिरीकडे जास्त गंभीरपणे लक्ष द्यावे, असा टोला विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी लगावला आहे.कारकीर्द घडवण्याचे त्यांचे वय आहे, सध्या ते मोटारीची जाहिरात करणे तसेच त्यासोबत सेल्फी काढणे यातच दंग आहेत, त्यापेक्षा आपली कामगिरी कशी सरस होईल याकडेही पाहावे, असा टोलाही गावसकर यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!