पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. विशेष म्हणजे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुण्यातील आंबेगाव तालुक्यातच एका सराईत गुन्हेगारावर गोळ्या झाडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. कारण भरदिवसा रस्त्यावर ही हत्या करण्यात आली आहे.
संबंधित घटना ही आंबेगाव तालुक्यातील एकलहरे गावात घडली. एकलहरे गावातील रस्त्यावर भर दिवसा कुख्यात गुंड ओंकार याच्यावर आरोपींनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते पळून गेले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गुन्हेगारांना पोलिसांची काहीच भीती राहिलेली नाही. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
राज्यातील कायदा व सुव्यस्था ढासळली असल्याचे सिद्ध होतांना दिसत आहेच. कारण खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात गुन्हेगारीत वाढ? भरदिवसा गोळ्या झाडून होतेय हत्या?
मा पोलीस महासंचालक यांना विनंती जनतेच्या भल्यासाठी ही परिस्थिती आपण आटोक्यात आणण्यासाठी कठोर निर्णय कराच. https://t.co/zXzlRRPuoi— Pravin Alai (प्रविण अलई) (@PravinAlai) August 2, 2021
दरम्यान, गृहमंत्र्यांच्या तालुक्यातच अशी घटना घडल्याने विरोधीपक्ष असणाऱ्या भाजपला टीका करण्याची संधी मिळाली आहे. भाजपनेते प्रवीण अलई या यासंदर्भात ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, राज्यातील कायदा व सुव्यस्था ढासळली असल्याचे सिद्ध होतांना दिसत आहेच. कारण खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात गुन्हेगारीत वाढ? भरदिवसा गोळ्या झाडून होतेय हत्या? पोलीस महासंचालक यांना विनंती जनतेच्या भल्यासाठी ही परिस्थिती आपण आटोक्यात आणण्यासाठी कठोर निर्णय कराच असे त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बीसीसीआयचा पीसीबीला असाही झटका, पाकविरुद्धची मालिका सोडून खेळाडू खेळणार आयपीएल
- लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या; उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना
- मोदींचा निर्णय! सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण होणार नाही
- ‘महापुरावर कायमस्वरुपी तोडगा काढणारच, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही हे माझं वचन’
- विरोधक सभागृहात येऊन चर्चेत सहभागी होण्याऐवजी ते चर्चेपासून दूर पळत आहेत – भाजप


