Share

लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या; उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्यापासून राज्यात पुन्हा निर्बंध कडक केल्यानंतर मुंबई लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली होती. आता जनजीवन पूर्वपदावर येत असून कोरोना स्थिती देखील आटोक्यात येत आहे. त्यामुळे लोकल प्रवासाची मुभा सर्वसामान्यांना मिळावी अशी मागणी मागील महिनाभरापासून जोर धरू लागली आहे.

याबाबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मंत्रिमंडळ बैठकीत कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलप्रवास करण्यास मुभा देण्यावर चर्चा केली जाईल असं म्हटलं होतं. मात्र, अद्याप सामान्य मुंबईकरांच्या लोकलप्रवासाबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात असल्याचं म्हटलं आहे.

आता लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा का देत नाही. लसीकरण झालेल्यांना घरी बसायला लावू शकत नाही. त्यांच्याही अडचणी आहेत. सरकारने लसीकरण झालेल्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करावा अशी सूचना उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला केली आहे. उच्च न्यायालयात वकिलांना प्रवासाची परवानगी देण्याच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने ही सूचना केली.

सुनावणीदरम्यान हायकोर्टाने राज्य सरकारला गेल्या वर्षीच्या तुलनेत वेगळी स्थिती आहे. त्यामुळे वकीलच नाही तर अन्य क्षेत्रांतील लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा उपलब्ध करण्याबाबत विचार करण्याची सूचना यावेळी केली. तर, गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार असून यावेळी सर्वसामान्यांना प्रवास देण्यासंबंधी देखील निर्णय होण्याची शक्यता असून उच्च न्यायालयाने तसे आदेश दिल्यास राज्य सरकारला देखील यासाठी हिरवा कंदील द्यावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!