Share

लोकसभेत तिसऱ्यांदा तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  लोकसभेत आज अतिशय महत्वपूर्ण अशा तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु होती. दरम्यान लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकास मंजुरी देण्यात आली. तिहेरी तलाक या विधेयकावर चर्चा करताना एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी जोरदार विरोध केल्याचे पाहायला मिळाले.

लोकसभेत आज अतिशय महत्वपूर्ण अशा तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा झाली . हे विधेयक आता चर्चेच्या अंतिम टप्यात आले होते. मात्र या विधेयकावर चर्चा करताना एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी जोरदार विरोध करत धक्कादायक वक्तव्य केले.

दरम्यान इस्लाममध्ये लग्न हे एक कॉन्ट्रॅक्ट आहे. त्याला सात जन्माच्या बंधनात अडकवू नका असे ओवेसी म्हणाले आहेत. नवरा तलाक देत असेल तर त्याला मेहरच्या रकमेच्या कितीतरी पटीने अधिक पैसे पत्नीला द्यावे लागतात, असे ही ओवेसी म्हणाले. 23 लाख हिंदू महिला त्यांच्या पतीपासून वेगळ्या राहत आहेत. त्या महिलांसाठी हे सरकार काहीच का करत नाही, असा सवाल देखील ओवेसींनी यावेळी उपस्थित केला.
कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकाबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. यावेळी ओवेसी यांनी काही मुद्दे उपस्थित करत मोदी सरकारला सवाल केले. तर ओवेसींच्या या तर्क – वितर्कानंतर भाजप खा. पूनम महाजन यांनी महिलांची बाजू मांडत ओवेसींचे प्रश्न खोडून काढले.

दरम्यान लोकसभेत लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकास मंजुरी देण्यात आली. या विधेयकाच्या बाजूनं ३०३ खासदारांनी मतदान केलं. तर ८२ खासदारांनी या विधेयका विरोधात मतदान केलं. इतकेच नव्हे तर यावेळी काँग्रेसचे खासदार सभागृहातून बाहेर पडल्याचे समोर समोर आले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!