🕒 1 min read
नवी दिल्ली : अमेरिकीची वादग्रस्त पॉप सिंगर रिहाना तिचे गाणे आणि जगावेगळ्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने शेतकरी चळवळीबद्दल ट्विट केले होते, त्यामुळे तिची देशात तसेच परेदशात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. आता पुन्हा एकदा रिहानाने नवा वाद ओढवून घेतला आहे. एका लिंगरी ब्रँडच्या फोटोशूटदरम्यान तिने गळ्यात गणपतीचं पेंडंट घालून टॉपलेस फोटो शूट केला आहे.
रिहानाने लिंगरी ब्रँडसाठी एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तिने टॉपलेस पोझ दिले आहे. यावेळी तिने आपल्या गळ्यात गणपतीचे पेंडंट परिधान केले आहे. रिहानाने हा फोटो पोस्ट करून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप होत असून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
It's appalling to see how @Rihanna shamefully mocks our beloved Hindu God #Ganesha. This exposes how #Rihanna has no idea or respect for Indian culture, tradition and our issues here. Hopefully, at least now @RahulGandhi and other Congress leaders will stop taking help from her https://t.co/7zUpnO05GL
— Ram Kadam (@ramkadam) February 16, 2021
दरम्यान, भाजप नेते राम कदम यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. ‘रिहानाने ज्या पद्धतीने आमच्या हिंदू दैवताची खिल्ली उडवली आहे, ते अतिशय नीच कृत्य आहे. भारतीय संस्कृतीबद्दल रिहानाला काहीही ठाऊक नाही आणि या संस्कृतीबद्दल अजिबात आदर नाही, हे यावरून स्पष्ट आहे. आता तरी राहुल गांधी व अन्य काँग्रेस नेते तिची मदत घेणे थांबवतील, अशी अपेक्षा आहे,’ अशा आशयाचे ट्वीट करत राम कदम यांनी रिहानाच्या फोटोवर आक्षेप नोंदवला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचं ‘शिवसंपर्क अभियान’ चालू शकतं तर मग शिवभक्तांच्या शिवजयंतीवरच निर्बंध का ?
- जालनेकरांची खड्डेमय रस्त्यातून होणार सुटका; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नांना यश
- ये नया हिंदुस्तान है…जाणून घ्या LAC वरुन चीनने अचानक माघार का घेतली?
- पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने विरोधकांच्या भूमिकेवर यु-टर्न सारखी शेरेबाजी करणे शोभते का ?
- उद्धव ठाकरे हे संवेदनशील नेते; राज्यात कायद्याचचं राज्य आहे – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
