औरंगाबाद : ब्रेक द चेनमध्ये कडक निर्बंध लागू करतांना रिक्षा परमिटधारकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून राज्य सरकारने दीड हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. जिल्ह्यातील १२ हजार परमिटधारक रिक्षाचालकांपैकी तब्बल १० हजार ५९६ रिक्षा परमिटधारकांना अनुदान खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती यांनी प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी दिली.
५ महिन्यांपूर्वी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या धर्तीवर राज्यातील सुमारे पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. ही रक्कम थेट फेरीवाल्यांच्या बँक खात्यात जमा होईल. तसेच राज्यातील बारा लाख रिक्षाचालकांनाही प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल. अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर मदत जमा करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये रिक्षाचालकांना दीड हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता हे अनुदान रिक्षाचालकांच्या थेट खात्यावर जमा करण्यासाठी परिवहन विभागाने ऑनलाइन प्रक्रिया मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राबवण्यास सुरुवात केली होती.
परिवहन विभागाच्या वेबसाईटवर हे अर्ज भरून घेण्यात आले होते. या अर्जात त्रुटी असलेल्या दोन हजार परमिट धारकांना अर्जातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर उर्वरित १० हजार ५९६ रिक्षा परमिटधारकांना अनुदान वितरित करण्यात आले आहे. यासाठी आधार कार्ड बँक पासबुक गरजेचे आहे. ऑनलाईन अर्ज केलेल्या रिक्षा परमिट धारकांनी आधार कार्ड, बँक खाते क्रमांक लिक करून घ्यावे. आपल्या अर्जातील त्रुटी दूर करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आरटीओ अधिकारी संजय मेत्रेवार यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्याला बंदिवान केल्याचा रेकॉर्ड मुख्यमंत्र्यांच्या नावावर’, भाजपचा टोला
- ‘राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे हल्लेखोर फेरीवाल्याला प्रसाद देणार’ ; अविनाश जाधव आक्रमक
- अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधील घरावर अज्ञातांकडून दगडफेक
- सोमय्यांचा गंभीर आरोप! ‘खा.भावना गवळींनी ७० कोटींची ट्रस्ट त्यांचा पीए सईद खानच्या नावे केली’
- … मग अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या फेरिवाल्यांवर तर कठोर कारवाई केलीच पाहिजे – नांदगावकर

