औरंगाबाद : कोरोनाचा काळ आहे, उद्या आपणही सेवानिवृत्त होणार आहोत, नागरिक परेशान आहे. अशा परिस्थितीत सेवानिवृत्त धारकांचा पगार वेळेवर का होत नाही ? असे खडे बोल सुनावत, यापुढे प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेच्या आत सेवानिवृत्त धारकांची त्यांच्या खात्यात पेन्शन जमा करण्यात आली पाहिजे अशा सूचना जिल्हा परिषदचे सीईओ डॉ. मंगेश गोंदवले यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना कोल्या आहेत.
सेवानिवृत्त धारकांना वेळेवर पेन्शन मिळत नाही, असे निवेदन गुरुवारी जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हा परिषद सीईओंना देण्यात आले होते. यावर सीईओंनी गुरुवारी (ता.२२) कोषागार विभाग, सामान्य प्रशासन तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना बोलवत चांगलेच खडसावले.
यावेळी सामान्य प्रशासन व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी कोषागार विभागातील कर्मचारी सहकार्य करत नसल्याचा आरोप केला. तर यावर कोषागार विभागातील अधिकाऱ्यांना सीईओंनी विचारले असता पेन्शनला इतका उशीर का होतो. यावर कोषागार विभागातील अधिकाऱ्यांनी उत्तर दिले की, सामान्य प्रशासन व शिक्षण विभागातुन मुळ शाहीचे पत्र व वेळेवर बिल येत नाहीत.
यांच्याकडुन बिल उशिरा आल्यामुळे पेन्शनसला उशीर होतो, अन्यथा दोन दिवसाच्या आत आम्ही पेन्शन धारकाच्या खात्यात पगार करू असे ते म्हणाले. एकामेकांच्या या आरोपावर जिल्हा परिषद विभागातील अधिकाऱ्यांत समन्वय नसल्याचे समोर आले. यावर सीईओंनी दोन्हीही अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. व यापुढे प्रत्येक महिन्याच्या एक ते पाच तारखेच्या आत पेन्शन करण्याच्या सूचना सीईओंनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री ठाकरेंकडून विरार घटनेच्या चौकशीचे आदेश
- ‘विरारसारख्या घटना वारंवार घडताहेत, कठोर पावलं उचलणे गरजेचे’, मंत्री वर्षा गायकवाड यांचे ट्विट
- कोरोना परिस्थितीवर पंतप्रधान मोदींची आज उच्चस्तरीय बैठक
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- ‘हवं तर मी तुमच्या पाया पडतो पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन द्या!’


