औरंगाबाद : बँक खात्याची अचूक माहिती देत निवृत्त सहायक फौजदाराला भामट्याने सव्वालाखाला गंडवले. हा प्रकार ४ जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. विशेष म्हणजे निवृत्त सहायक फौजदाराच्या खात्यातून तीनवेळा ही रक्कम लांबवण्यात आली.
पोलीस आयुक्तालयाच्या मोटार परिवहन विभागातील निवृत्त सहायक फौजदार अमरसिंग किशनसिंग चौधरी (६०, रा. दि विनस लोटस अपार्टमेंट, मुस्तफाबाद, बीड बायपास रोड) यांच्या मोबाइलवर सायंकाळी पाचच्या सुमारास भामट्याने संपर्क साधला. त्यावेळी त्याने एसबीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगत त्यांच्या मिलकॉर्नर येथील वेतन खात्यातील रकमेची अचूक माहिती सांगितली. त्याचसोबत त्याने खाते अपडेट करायचे असल्यामुळे मोबाइल क्रमांक लिंक करायचा आहे.
तेव्हा मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक सांगा असे म्हणाला. त्यामुळे चौधरी यांचा भामट्यावर विश्वास बसला. चौधरी यांनी मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक सांगताच अवघ्या काही मिनिटात त्यांच्या खात्यातील एक लाख आठ हजार ९९८ रुपये भामट्याने लांबवले. हा प्रकार उघडकीस आल्यावर चौधरी यांना धक्का बसला. त्यानंतर सोमवारी सायंकाळी चौधरी यांच्या तक्रारीवरुन सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- एक महिना तीन दिवस झाले तरी राज्य सरकाने स्वतंत्र पुनर्विचार याचिका का दाखल केली नाही?
- ‘पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाविकास आघाडीनेही राज्यातील गरिबांना भरघोस मदत करावी’
- उरवडे येथील आगीला जबाबदार कोण ? गृहमंत्री म्हणतात…
- “पीक विमा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा”, परभणीत भाजप तर्फे आंदोलन
- ‘नरेंद्र मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्य सरकारने करून घेऊ नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

