🕒 1 min read
मुंबई : राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले निर्बंध काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. मात्र, काही प्रमाणात आणि काही भागात अजूनही निर्बंध आहेत. त्यामुळे विरोधकांनी सरकारला घेरण्याचा या निमित्ताने पर्यटन सुरु केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली.
या परिषदेत त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबईतील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. रेस्टाँरंट, मॉल आणि दुकानं यांची वेळ वाढवावी या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स आणि रेस्टाँरंट मालक संघटनांशी चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितले आहे. तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘ विरोधी पक्षांनी कितीही दबाव टाकला तरी तसं काही त्यांच्या मनाप्रमाणे होणार नाही.
सरकारला बरीच कामे पहावे लागतात. मुंबईची परिस्थिती आधीसारखी होऊ नयेत. टप्याटप्याने सर्व सुरू करण्याचा प्रयत्न आहे. विरोधक कितीही दबाव टाकत असले, तरी आम्ही सर्वांचा विचार करत आहोत. गणेशोत्सव येत आहे, त्याबाबतसुद्धा नियमावली तयार होत आहे. मुख्यमंत्री स्वतः या सर्व बाबींवर काम करत आहेत, अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ए तू पांड्या सोबत नको राहू यार’ ; नव्या लूकमुळे शुभमन गिल होतोय ट्रोल
- सोलापूर जिल्ह्यावर लादण्यात आलेल्या निर्बंधांना व्यापारी महासंघाने केला तीव्र विरोध
- ‘खेळाडूंना ओळखण्यासाठी शेजाऱ्याकडून चष्मा उधार घ्यावा लागेल’, सोशल मीडियावरून मोदींवर टीका
- निर्बंध शिथिल करण्याबाबत पुण्याला वेगळा आणि सोलापूरला वेगळा न्याय का ?
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
