Share

पुण्यात निर्बंध अजून कडक होण्याची शक्यता; उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

Published On: 

🕒 1 min read

पुणे: राज्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच मुंबईत आता कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांची दिवसभरातील संख्या २० हजारांवर गेल्यास मुंबईत लॉकडाऊन करावाच लागेल. असा इशारा मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल(Iqubal chahal) यांनी दिला आहे. त्यातच आता पुण्यातही निर्बंध अजून कडक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी यासंबंधी तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक आज साडे चार वाजता होणार आहे. या बैठकीत कोरोना रुग्णसंख्या, लसीकरण याबाबत चर्चा करून निर्बंध अजून कडक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळाही पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. तर विद्यापीठाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज १२ वाजता बैठक बोलावली आहे.

दरम्यान, काल(३ जाने.)मुंबईत ८ हजार ८२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सोमवारी(२ जाने.) ६२२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची रुग्णसंख्या आता ५७८ वर पोहोचली असून २५९ रुग्ण बरे झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!