अकोला : महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर पायी वारीला परवानगी देण्यात आली नाही. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरित आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे.
मात्र, पायी आषाढी वारीला जाण्याची इच्छा असलेल्या वारकऱ्यांच्या भावनेचा सरकारने आदर करावा आणि त्यांच्याशी चर्चा करावी, अशी मागणी विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी केली आहे. अन्यथा माझी वारी माझी जबाबदारीची हाक देत पंढरपूरसाठी रवाना होऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय.
विदर्भाच्या इतिहासात प्रथमच वारकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी गत आठवड्यात विभागीय कार्यालयात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. वारकरी संघटना प्रमुख व दिंडी चालकांची प्रशासकीय बैठक पार पडली आणि सोनाळा येथील दिंडीप्रमुख साबळे महाराज यांनी आपली भावना प्रकट केली होती. पालखी सोहळ्याच्या संस्थांनिकांनी सरकारने दिलेला निर्णय मान्य केलेला आहे व सरकारच्या निर्णयाचा आदर करून आम्ही वाहनाने पंढरपूरला जाण्यासाठी तयार आहोत, अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे.
पण वारकरी मंडळींमध्ये पायी वारी रद्द झाल्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे. पायी वारी हा वारकऱ्यांचा प्राण आहे. कोरोनाचे संकट महाराष्ट्रात आहे, हे आम्ही जाणून आहोत; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनात घेतलं तर पायी वारी होणे अशक्य नाही, असेही वारकऱ्यांचे म्हणणंय.
महत्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारचा निर्णय दारू विक्रेत्यांसाठी’, चंद्रपूर दारूबंदी उठवण्याचा ५०० गावांकडून निषेध
- राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विनापरवानगी सत्कार सोहळा, मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
- ‘रावसाहेब दानवे हे आमचे चांगले मित्र, त्यांच्या विनोदी शैलीचे कौतुकच’, राऊतांची प्रतिक्रिया
- बाजारभावापेक्षा कमी किमतीतच जमीन खरेदी, राममंदिर ट्रस्टचा खुलासा
- अजित पवारांच्या आवाहनावर संभाजीराजेंची प्रतिक्रिया, म्हणाले..


