Share

लोकसहभागातून महाराष्ट्राच्या हरित निर्धाराचा संकल्प : मुनगंटीवार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे येत्या ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींशी लाईव्ह ‘महा ई -संवाद’ साधणार आहेत. राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी मुनगंटीवार थेट चर्चा करतील. या सर्वांना मोबाईल, लॅपटॉप, संगणक किंवा टॅबद्वारे www.parthlive.com या लिंकवर क्लिक करून कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.

हरित महाराष्ट्राच्या निर्धाराने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसहभागातून तीन वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला. या वृक्षलागवडीच्या पहिल्या टप्प्यात २०१७ साली ४ कोटी वृक्षलागवडीच्या बदल्यात ५ कोटी ४३ लाख वृक्ष राज्यात लागले. यात १६ लाख लोकांनी सहभाग नोंदवला. या वृक्षलागवडीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. २०१८ साली १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प १५ कोटी ८८ लाख वृक्ष लागून पूर्णत्वाला गेला. या वृक्षलागवडीत राज्यातील ३६ लाख लोक सहभागी झाले आणि वृक्षलागवड हा केवळ शासनाचा उपक्रम न राहता ती खऱ्या अर्थाने लोकचळवळ झाल्याचे दृष्टीपथात आले.

यावर्षी २०१९ च्या पावसाळ्यात राज्यात ३३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प आहे. हे वृक्षधनुष्य पेलताना दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार राज्यात २१ कोटी ५० लाख वृक्षलागवड झाली आहे. साधारणत: ५४ लाख लोकांनी आतापर्यंत वृक्षलागवड कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या निर्धारित कालावधीत राज्यात लागणाऱ्या ३३ कोटी वृक्षलागवडीचा अर्ध्याहून अधिक टप्पा जुलै अखेरपर्यंतच पूर्ण झाला आहे. त्यामुळे राज्यात केलेला ३३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प १ कोटीपेक्षा अधिक लोकांच्या सहभागातून पूर्णत्वाला जाईल आणि संकल्पापेक्षा राज्यात अधिक वृक्षलागवड होईल, असा विश्वास वनमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

शिवस्वराज्याची सनद की राष्ट्रवादीचा आगामी निवडणुकीचा जाहीरनामा ?

फ्लॅट आणि सोसायटी परिसरात कुर्बानी देण्यास मनाई, उच्च न्यायालयाचा आदेश

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!