Share

शिवस्वराज्याची सनद की राष्ट्रवादीचा आगामी निवडणुकीचा जाहीरनामा ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षांनी मोर्चेबंधणीला सुरवात केली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ‘शिवस्वराज्य यात्रेचे’ आयोजन केले आहे. या यात्रेत खा. कोल्हे आपल्या पक्षाला बळ देणार असून राज्यातील जनतेला विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या भूमिका समजावून सांगणार आहेत.

लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. एका बाजूला भाजप आणि शिवसेना जनसंपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. तर याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे.

‘नव्या स्वराज्याचा नवा लढा’ अशी घोषणा देत शिवस्वराज्य स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचा प्रारंभ झाला असून जनतेशी संवाद साधण्यासाठी जुन्नर येथील पहिल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ट नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खा. अमोल कोल्हे, राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, आ. विद्या चव्हाण आणि मेहबूब शेख, रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, ईश्वर बाळबुधे, पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान,शिवस्वराज्याची सनद सादर करत राष्ट्रवादीने एकप्रकारे आगामी निवडणुकीचा जाहीरनामा सादर केला असल्याची चर्चा आहे. या सनदेतून जी आश्वासने देण्यात आली आहेत ती याआधी सत्तेत असताना राष्ट्रवादीने का पूर्ण केली नाहीत असा देखील सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

शिवस्वराज्याची सनद-

शिवस्वराज्याचा जागरूक नागरिक म्हणून मी शपथ घेतो की, स्वराज्यातील प्रत्येकाला चांगलं आयुष्य मिळवून देणं, हे माझं कर्तव्य आहे. त्यासाठी मी प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण मिळवून देईन. युवकांना उच्च शिक्षणासाठी सहाय्य मिळवून देईन. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासोबतचं भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण मिळवून देईन. पाणी, वीज, कृषी मालाचा दर असे शेतकऱ्यांचे प्रश्न मी सोडवेन. माता-भगिनी सबल सक्षम आणि सुरक्षित होण्यासाठी मी कष्ट घेईन. स्थानिक उद्योगांच्या वाढीसाठी मी कटिबद्ध असेन. सामाजिक न्यायासाठी मी प्राणपणाने लढेन. अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि उपेक्षित घटकांना सर्वोतोपरी मी मदत करेन आणि संरक्षण देईन. आदिवासी समाज बांधवांना मुख्य धारेमध्ये आणण्यासाठी मी प्रयत्न करेन. बहुजन समाजाचे हित जपण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असेन. शहरी आणि ग्रामीण भागाचा समतोल राखण्यासाठी मी काम करेन. प्रत्येकाला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी मी प्रयत्न करेन. तंत्रज्ञानामुळे मिळणाऱ्या सोयी-सुविधा समाजातील प्रत्येक घटकापर्यत पोहचवेन. प्रत्येक कामगाराला कामाची शाश्वती, सुरक्षितता आणि उत्तम भविष्य मिळवून देईन. ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्मानदायक आणि सुरक्षित वातावरण निर्माण करेन. आणि या सर्वांद्वारे निर्माण होणारं स्वराज्य जपण्यासाठी मी प्राणपणाने लढेन. जय शिवराय…जय महाराष्ट्र…

दरम्यान, राष्ट्रवादीच्या बहुउद्देशीय या ‘शिवस्वराज्य यात्रेत’ गटबाजी असल्याचं समोर आले आहे. तर पक्षातील काही नेत्यांना विश्वासात व विचारात न घेता या यात्रेचे आयोजन केले असल्याची कुजबुज पक्षात सुरु आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावरून आज महाराजांचा आशीर्वाद घेऊन डॉ. अमोल कोल्हे आणि धनंजय मुंडे यांनी शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली. मात्र, या ‘शिवस्वराज्य यात्रे’तून पक्षाचे कट्टर पुरोगामी नेते जितेंद्र आव्हाड यांना लांब ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ‘पक्षाने माझा कधी वापरच केला नसल्याची’ खंत आव्हाड यांनी बोलून दाखवली होती. त्यानुसार आज आव्हाड यांना शिवस्वराज्य यात्रेत टाळलं जात असल्याचं दिसत आहे.

घटनेतील ३७० कलम हटवण्याच्या मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचे हे आहेत फायदे

युती करताना मंत्रिपदांची नाही, तर कलम ३७० आणि राम मंदिराची अट घातली – संजय राऊत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!