मुंबई : ओबीसी राजकीय आरक्षणासाठी भाजपाने उद्या राज्यभरात चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. तर, आता काँग्रेसने देखील भाजपावर पलटवार करत, देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी, ‘आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवणे हा आरएसएसचा उद्देश आहे. संघाच्या इशाऱ्यावर चालणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करत असल्याची टीका केलीय.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे.
आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असून संघाच्या इशा-यावर चालणारे केंद्रातील @narendramodi सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करत आहे. @Dev_Fadnavis ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत. 2/3
— Nana Patole (@NANA_PATOLE) June 25, 2021
आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असून संघाच्या इशाऱ्यावर चालणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करत आहे. देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत’ असा गंभीर आरोप पटोलेंनी केला आहे.
काँग्रेसही करणार आंदोलन
कोणत्याही परिस्थितीत निवडणुका होऊ देणार नाही, असा पवित्रा ओबीसी नेते घेत असताना आता निवडणुका लागल्याने हा मुद्दा पेटणार असल्याचे चिन्ह आहे. भाजपमधील ओबीसी नेत्यांनी देखील या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली असून राज्यसरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. यासाठीच 26 जूनला म्हणजेच उद्याच राज्यभर भाजपचे चक्काजाम आंदोलन आहे. काँग्रेस देखील ओबीसी आरक्षणासाठी आक्रमक झाला असून निवडणुकांची घोषणा झाल्याने आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यात सत्ताधारी असलेल्या काँग्रेस पक्ष उद्याच म्हणजेच २६ जून रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांची प्रथमच प्रतिक्रिया, म्हणाले..
- गंभीर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ७७६ डॉक्टरांनी गमावला जीव
- मोठी बातमी! डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अनलॉक नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल
- धक्कादायक! माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक
- ‘गोपीनाथ मुंडे नसले तरी त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय’, पंकजा मुंडेंचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

