दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार करण्यात आला. ४३ नव्या मंत्र्यांनी ७ जुलैला मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातील नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे, ‘लोक जनशक्ती’च्या बंडखोर गटाचे प्रमुख पशुपती पारस, ‘अपना दला’च्या अनुप्रिया पटेल यांचाही मोदींच्या मंत्रीमंडळामध्ये समावेश करुन घेण्यात आला आहे. दरम्यान, या मंत्र्यांबाबत असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) अहवाल प्रकाशित केला आहे. यामध्ये १ कोटी रुपयांहून अधिक कर्ज असलेले १६ मंत्री आहेत. यामध्ये खासदार नारायण राणे पहिल्या क्रमांकावर आहे, अशी माहिती ADR च्या अहवालातून समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी ADR ने मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातील नेत्यांसंदर्भातील अहवाल सादर केला आहे. या नव्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांवर १ कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज आहे. या यादीमध्ये खासादर नारायण राणे, पीयुष गोयल आणि कृष्ण हे पहिल्या तीनमध्ये आहेत. यात नारायण राणे हे सर्वाधिक कर्ज डोक्यावर असलेले मंत्री ठरले आहेत. त्यांच्यावर ३० कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. तर त्यांची वैयक्तिक संपती ८७ कोटी रुपये इतकी असल्याची माहिती देखील यातून पुढे आली आहे.
तसेच मोदी सरकारमधील 43 टक्के म्हणजे 33 मंत्र्यावर गुन्हे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले असून त्यातील 24 मंत्र्यावर हत्या किंवा हत्येचे प्रयत्न अशा सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत असे या संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अमित शाह हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत त्यांचे नाव घेऊन भाजपा नेत्यांनी धमक्या देऊ नयेत’
- मनगढत कहाण्या बनविण्याचं काम सुरू, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला – नाना पटोले
- हे राजपुत्रांनी राजपुत्रांसाठी चालवलेलं सरकार, भाजप आमदाराचा आरोप
- ‘नाना पटोलेंची भूमिका सरकारला सुरुंग लावणारी’ ; अजितदादांचा आक्रमक पवित्रा
- ‘काँग्रेसने ज्या शिवसेनेला पाळलं, त्यांच्या प्रमुखांनीच पाळत ठेवली हे किती वाईट!’; भाजप नेत्याची बोचरी टीका


