अकोला – पावसाळा सुरू झाला तरी खरीप हंगामासाठीचे शेतकऱ्यांचे कर्जवाटप ठप्प आहे. शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पीककर्जाचे वाटप सुरू करावे तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी सोमवारपासून राज्यात ठिकठिकाणी “कर्जमाफी करा, पीक कर्ज द्या,” आंदोलन करेल, अशी घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
तर दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याचे वतीने देखील आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व कर्जवाटप महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब करावे. कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी या मागणीसाठी सोमवारी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याचे वतीने शेताच्या बांधावर कर्जमुक्ती आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, मागील दोन वर्षांत ज्या शेतकरी लोकांनी पीक कर्ज घेतले त्या शेतकऱ्यांना शासनाने पीक कर्ज माफीमध्ये बसविले नाही. त्यांना तत्काळ कर्ज माफीसाठी पात्र ठरविण्यात यावे. दोन लाखांच्या वर ज्या शेतकऱ्यांवर कर्ज आहे, त्यांना सुध्दा कर्ज माफी द्यावी, ज्या शेतकरी बांधवांना कर्ज माफी झाली पण त्यांच्या खात्यात अद्यापपर्यंत शासनाने पैसे जमा केले नाहीत म्हणून ते शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत त्यांना सुध्दा त्वरीत लाभ व्हावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
तर मुख्यमंत्र्याच्या चिंता वाढतील, मित्रपक्षातील ‘या’ नेत्याने दिला सूचक इशारा
बळीराजासाठी आनंदाची बातमी : कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ १० मार्चपासून
‘अशोकराव केंद्रावर टीका करण्यापूर्वी आधी आपण काय केले सांगा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

