टीम महाराष्ट्र देशा : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारने केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी लाभदायक नसल्याचे दिसून येत आहे. अशातच शेतकरी दूध संकलन केंद्राच्या उद्घाटन समारंभात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सूचक इशारा दिला आहे.
”महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना चिंता मुक्त केले नाही, तर मुख्यमंत्र्याच्या चिंता वाढतील’ असा सूचक इशारा शेट्टी दिला आहे. तसेच ग्रामीण भागातील लहान मुलांच्या हातात पाटीपुस्तकाऐवजी दुधाची कीटली पहायला मिळत आहे. जोपर्यंत सरसकट शेतकरी कर्ज मुक्त होत नाही, तोपर्यत स्वाभिमानी शेतकरी संघटना शांत बसनार नाही.
शेट्टी यांचा स्वाभीमानी शेकतरी संघटना हा पक्ष महाविकास आघाडीतील मित्र पक्ष आहे. परंतु, मंत्रीमंडळ विस्तारात त्यांच्या पक्षाला एकही मंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे पक्षात नाराजी असल्याचे बोलले जात आहे. परवाच झालेल्या शपथ विधी सोहळ्यालाही शेट्टी हजर नव्हते. त्यातच त्यांनी दिलेला हा इशारा म्हणजे पक्षातील नाराजीचे चित्र असल्याचे बोलले जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

