मुंबई : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी व्हायला पाहीजे होते मात्र या अटीतटीच्या निवडणुकीत जो बायडेन विजयी झाले. त्यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे स्वागत. लोकशाहीचा कौल मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारला पाहिजे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
अमेरिकेची पहिली महिला उपाध्यक्षा म्हणून ऐतिहासिक विजय मिळवलेल्या कमला हॅरिस यांचेही रामदास आठवले यांनी अभिनंदन केले आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांच्या नेतृत्वात अमेरिका आणि भारत दोन्ही राष्ट्रांचे सबंध अधिक दृढ होतील.अमेरिकेच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल असा विश्वासरामदास आठवले यांनी व्यक्त केला.
अमेरिकेत स्थायिक भारतीयांना न्याय देण्याचे काम अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा कमला हॅरिस करतील असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. तर, देशातील इतर नेत्यांनी देखील जो बायडेन यांच्या विजयाचे स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांचं अभिनंदन व्यक्त करत येणाऱ्या काळात भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- जो बायडेनना शेअर बाजाराची देखील सलामी; मुंबई शेअर बाजारामध्ये सेन्सेक्सचा ऐतिहासिक उच्चांक
- कमला हॅरिस यांचा विजय आणि मल्लिका शेरावतच ११ वर्षांपूर्वीच्या ट्विट होतय व्हायरल…
- ‘उद्धव ठाकरे यांचे ‘ते’ विधान म्हणजे शिखंडीच्या आड दडून टीका करण्यासारखे आहे’
- हिटमॅन रोहित शर्माच्या फॅन्ससाठी महत्वाची बातमी!, बीसीसीआयने घेतला ‘हा’ निर्णय
- ‘प्रभू श्रीरामांनी रावणाचा जसा पराभव केला, तसाच करोनाचाही पराभव होणार’ – बोरिस जॉन्सन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

