मुंबई : १४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. त्याच्या अचानक जाण्याने चाहत्यांसह बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता. दरम्यान, त्याच्या घरच्यांनी यामध्ये घातपताची शक्यता व्यक्त केली होती. यानंतर या प्रकरणाने वेगळीच कलाटणी घेतली. अभिनेत्री कंगना रणौतने यामध्ये नेपोटीजम असून अनेक बड्या बॉलिवूड दिग्दर्शकांवर आरोप लावले होते.
यानंतर, तिने मुंबई पोलिसांवरच तपासावरून संशय घेत आरोप केले . मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते अशा आशयाचे ट्विट केले होते. दरम्यान, मला मुंबईत न येण्याची धमकी दिली जात आहे. मुंबईत असुरक्षित वाटत असून मुंबई आता पाकव्याप्त काश्मिरसारखी झाली आहे, असे वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावतने शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये पाऊल ठेवू न देण्याच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया देताना केले होते.
कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता तिला चांगलेच धारेवर धरले जात असून अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी देखील तिचा खरपूस समाचार घेतला आहे. ” मुंबई असं शहर आहे, जिथं आपलं बॉलिवूड स्टार व्हायचं स्वप्न पूर्ण झालं. त्यामुळं कुणीही आपल्याकडून या शहराप्रती आदर व्यक्त व्हावा, अशीच अपेक्षा व्यक्त करेन. तू पीओकेसोबत मुंबईची तुलना केलीस, हे भीतीदायक आहे. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला,” असं ट्विटच शहाणेंनी कंगनाला टॅग करत केलं आहे.
Dear @KanganaTeam Mumbai is the city where your dream of becoming a Bollywood star has been fulfilled, one would expect you to have some respect for this wonderful city. It's appalling how you compared Mumbai with POK! उचलली जीभ आणि लावली टाळ्याला ???? https://t.co/FXjkGxqfBK
— Renuka Shahane (@renukash) September 3, 2020
प्रवचन, अन्नदान करून बैलाचा दशक्रिया विधी संपन्न!
यावर, कंगना रणौतने देखील काही मिनिटांतच प्रत्युत्तर दिले. ” प्रिय रेणुकाजी, जेव्हा सरकारच्या खराब कारभारावर टीका केली जाते, तेव्हा ती प्रशासन आणि सरकारवर एकसमान पद्धतीनं केली जाते, मला विश्वास नाही की आपण इतक्या भोळ्या आहात. आपणसुद्धा तहानलेल्या गिधाडाप्रमाणे माझ्या रक्ताचा, माझ्या मांसाचा तुकडा घेण्याची वाट पाहत होता? आपल्याकडून चांगल्या अपेक्षा आहेत,” असे ट्विट कंगनाने केले.
कोरोनाला थांबविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज- आ.संग्राम जगताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

