Share

‘पहले मंदिर फिर सरकार’ म्हणणारे मुख्यमंत्री झाल्यावर लोकांना मंदिरात जाऊ देत नाहीत : मनसे नेते संदीप देशपांडे

Published On: 

मुंबई: महाराष्ट्रात भाजप,वंचित,एम आय एम नंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील मंदिर उघडण्यासाठीच्या आंदोलनात उडी मारली आहे. सरकारने लवकरात लवकर नियमावली आखून मंदीरं सुरू केली नाही तर आम्ही सरकारचा आदेश झुगारून मंदीरांमध्ये प्रवेश करु असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता .

दैनंदिन व्यवहारात सरकार सुट देत असताना सरकारने मंदीरंच का बंद ठेवली आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.यासंदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. आता, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी देखील ट्विट करून या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनावर सडकून टीका केला आहे.

प्रवचन, अन्नदान करून बैलाचा दशक्रिया विधी संपन्न!

शिवसेनेने निवडणुकांच्या काळात ‘पहले मंदिर फिर सरकार’ अशी घोषणा देत राम मंदिराबाबत आग्रह धरला होता, यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत मिळून शिवसेनेने सत्ता देखील स्थापन केली. तर, कोरोना काळात राम मंदिर निर्माणाचे उद्घाटन देखील झाले. मात्र, महाराष्ट्रात लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आलेला प्रार्थनास्थळे अजून देखील खुली न करण्यात आल्याने विरोधकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

कोरोनाला थांबविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज- आ.संग्राम जगताप

संदीप देशपांडे यांनी, ” ‘पहले मंदिर फिर सरकार’ ‘ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक’ म्हणणारे लोकांना मुख्यमंत्री झाल्यावर मंदिरात जाऊ देत नाहीत ह्याला निर्णय शैथिल्य म्हणायचे की तथागतीत पुरोगामीत्व सिद्ध करण्याची चढाओढ ??” असा खोचक सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेना व सामनावर टीका केली आहे.

साखर कारखाना कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या; प्रवरा उद्योग समूहाकडून कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने खबरदारी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!