अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जळके खुर्द येथील भिमादादा शिंदे यांच्या २७ वर्षीय बैलाचा दशक्रिया विधी गावातील मारुती मंदिरात बुधवारी सकाळी १० वाजता पार पडला. हभप नाईक महाराज यांचे यावेळी प्रवचन झाले. यावेळी जळके खुर्द गावातील ग्रामस्थांनी सामाजिक अंतर ठेवून प्रवचनास हजेरी लावली. यावेळी दशक्रिया विधी निमित्त बैलाच्या स्मरणार्थ गावकर्यांना अन्नदानही करण्यात आले. बैलाच्या दशक्रिया विधी निमित्त प्रवचन आयोजित केल्यामुळे तालुकाभर चांगलीच चर्चा रंगली आहे.
आदिवासी समाजातील भिमादादा शिंदे यांच्या बैलाचे वृद्धापकाळाने निधन झाले. शिंदे यांनी त्यांच्या राहत्या घरासमोरच त्याचा दफनविधी करुन समाधी बांधली. बैलाचा बुधवारी दशक्रिया विधी असल्यामुळे मालक भिमादादा शिंदे व कुटूंबियांना अश्रु अनावर झालेले होते.
कोरोनाला थांबविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज- आ.संग्राम जगताप
लहानपणापासून ह्या बैलाला मी खूप जपले अन् त्याने आमच्या कुटूंबियांना लळा लावला. मी त्याला शर्यतीमध्ये घेवून जायचो. प्रत्येक शर्यतीमध्ये त्याने विजय खेचून आणला. कधीही हार पत्करली नाही. त्याच्या जाण्याने आमच्या कुटूंबियांवर काळाने घाला घातला, अशी प्रतिक्रिया भिमादादा शिंदे यांनी दिली.
कोरोनाला थांबविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज- आ.संग्राम जगताप


