Share

कोरोनाला थांबविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज- आ.संग्राम जगताप

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. नगर शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या रोगाला थांबविण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. नागरिकांनी भीती न बाळगता आपल्या आरोग्याची तपासणी करुन उपचार घ्यावे, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.

तसेच कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे व अटींचे पालन प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. स्टेशन रोडवरील साईनाथ कोविड सेंटरच्यावतीने लक्षणे असणाऱ्यांसाठी स्वतंत्र २१ बेडचे कोविड सेंटरचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

साखर कारखाना कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या; प्रवरा उद्योग समूहाकडून कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने खबरदारी

यावेळी नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे, न्यूरो सर्जन डॉ.प्रशांत जाधव, डॉ.रोहित करांडे, डॉ.तुषार कोहक, डॉ.बाळासाहेब गाडे, डॉ.वैभव गाडे, डॉ.गणेश गोपनर आदी उपस्थित होते. शहरातील विविध नामांकित डॉक्टरांनी एकत्र येऊन हे सेंटर सुरु केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

कोरोनानंतर जनावरांमध्ये देखील संसर्गजन्य आजाराचा शिरकाव; पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!