Share

शरद पवार यांच्या तोंडातील अल्सर काढला; तब्येत एकदम ठणठणीत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आदरणीय शरद पवार रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता त्यांच्या तोंडात एक अल्सर आढळला असून तो काढण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

नवाब मलिक यांनी एका ट्विटच्या माध्यमातून ही माहिती जाहीर केली आहे. सध्या राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे हॉस्पिटलमध्येच दाखल असून ते पुरेशी विश्रांती घेत असल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

दरम्यान त्यांची तब्येत चांगली असून ते आता रुग्णालयात विश्रांती घेत आहेत.शिवाय देशभर पसरलेल्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत.ते लवकरच आपले कामकाज पुन्हा सुरू करतील असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास होऊ लागल्याने ३० मार्च रोजी त्यांच्या पित्ताशयातील खडे काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर शरद पवारांची गॉल ब्लॅडरची शस्त्रक्रिया केली होती.

त्यानंतरच्या नियमित आरोग्याच्या पाठपुराव्यासाठीच शरद पवार हे ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यावेळी त्यांच्या तोंडात अस्लर वाढल्याचे दिसून आले. त्यामुळेच तातडीने अस्लरवर शस्त्रक्रिया करून तो काढून टाकण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या      

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!