Share

तुम्ही आणलेलं विधेयक अर्धवट, 50 टक्क्यांची मर्यादा हटवा; संजय राऊतांची राज्यसभेत मागणी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : यंदा केंद्राचे पावसाळी अधिवेशन हे वादळी ठरलं आहे. पेगासस प्रकरण, शेतकरी आंदोलन, आदी मुद्द्यांवरून विरोधकांनी केंद्र सरकारची कोंडी केली होती. विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाजाचे बहुतांश दिवस हे वाया गेल्यानंतर १०२ व्या घटना दुरुस्तीनिमित्त विरोधकांनी एक पाऊल मागे घेत संसदेत उपस्थिती लावली. काल लोकसभेत १०२ व्या घटना दुरुस्तीचे विधेयक मांडण्यात आले. दोनतृतीयांश मतांनी घटना दुरुस्ती मान्य झाल्यानंतर आज राज्यसभेत हे विधेयक सादर करण्यात आले आहे.

यावर चर्चा करताना शिवसेना खासदार संजय राऊत हे चांगलेच कडाडल्याचे पाहायला मिळालं. तुम्ही आणलेलं बिल अर्धवट आहे. जोपर्यंत 50 टक्क्यांची मर्यादा हटवली जात नाही. तोपर्यंत फायदा नाही. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ही 30 वर्षांपासूनची आहे. त्यामुळे त्याचा काहीच फायदा होणार नाही. तुम्ही ही मर्यादा वाढवली पाहिजे. तुम्ही आता दुरुस्ती कराल, काही बदल कराल, त्याने काही होणार नाही. त्यासाठी तुम्हाला 50 टक्क्यांची मर्यादा हटवलीच पाहिजे,’ अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

‘छत्रपती आरक्षणासाठी आंदोलनात उतरले, हे कधी बघितलंय का ?

‘मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात आंदोलने केली, मोर्चे काढले. हे सर्व मोर्चे शांततेत झाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे स्वतः ५० टक्क्यांची अट काढून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आंदोलनात उतरले. आजही ते मराठा समाजासाठी आंदोलन, मोर्चे करत आहेत. छत्रपती आरक्षणासाठी आंदोलनात उतरले, हे या आधी कधी बघितलंय का ?’ असा सवाल करत संजय राऊत यांनी संभाजीराजे यांची पाठ थोपटली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!