मुंबई : प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमोला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर तातडीने त्याला कोकिलाबेन धीरुबाई इस्पितळात भरती करण्यात आलं. रेमोसोबत त्याची पत्नी लिजेल डिसूजाही इस्पितळात उपस्थित आहे. रेमोची एन्जिओग्राफी करण्यात आली आहे. सध्या त्याला अती दक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु होते.
झटक्यातून बरे झाल्यानंतर रेमोने त्याचा पहिला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याला त्याच्या निरोगी जिवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रेमोचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रेमोच्या बायकोने त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
बॉलिवूडमधील अनेक कलाकर रेमो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील रेमोसाठी ट्विट केले आहे.
https://www.instagram.com/p/CIxJy-Xl92w/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- मराठा आंदोलकांना घरात घुसुन मारलं जात आहे, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
- ‘ते’ बंगले खाजगी प्रॉपर्टी नाहीत, झालेल्या खर्चात काही गैर नाही – अशोक चव्हाण
- अहमद पटेल यांचे सत्तेत असूनही सत्तेतील पदांमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही : शरद पवार
- ‘राज्याचे मंत्री टू-व्हीलरने दिल्लीला जातात, पण आधी महाराष्ट्रात तरी दिवे लावा’
- ग्रामपंचायत निवणुकांसाठी राज ठाकरेंनी ठोकला शड्डू !


