🕒 1 min read
मुंबई: रशिया आणि युक्रेन युद्धाचे पडसाद सर्व जगावर उमटत आहेत. रशियाने युक्रीयावर केलेल्या हल्ल्यामुळे सर्वत्रच चिंतादायक वातावरण निर्माण झाले आहे. त्यात सर्वच देशांची भूमिका महत्वपूर्ण ठरत आहे. दरम्यान रशियाने केलेल्या हल्ल्याचे समर्थन करत चीनने रशियाला पाठींबा दर्शवला आहे. यापार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्वीट केले आहे.
“चीनचा रशियाला पाठिंबा दर्शवला आहे. रशिया-युक्रेन युद्धात देश कसे जुळवून घेत आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. ही स्थिती मला पंडित नेहरू आणि जगाने चांगल्या प्रकारे घेतलेल्या त्यांच्या नॉन-अलाइन (असंलग्न ) परराष्ट्र धोरणाची आठवण करून देते.”, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. दुसऱ्या महायुद्धात भारताने अलिप्ततेचे धोरण अवलंबिले होते.
#China supports #Russia in #RussiaUkraineWar
We should understand how countries are aligning
This reminds me of #Nehru and his non~aligned foreign policy well taken by the world— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 26, 2022
दरम्यान रशिया आणि युक्रेन या युद्धास्थितीत जग दोन बाजुंना विभागलं गेलं आहे. अमेरिका, ब्रिटन, युरोपीय देश असे अनेक देश युक्रेनला पाठिंबा देताना दिसत आहेत तर दुसरीकडे चीन आणि पाकिस्तान मात्र रशियाला पाठिंबा देत अप्रत्यक्षपणे युद्धाचंच समर्थन करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
“कुत्र्याला तुम्हाला घरात काय गादीवर जवळ घेऊन झोपायच ते झोपा, पण…”, अजित पवार भडकले
-
पाकिस्तान दौऱ्यासाठी जाण्याआधी डेव्हिड वॉर्नरने केली परिवारासाठी भावनिक पोस्ट; म्हणाला…
-
केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे शिखंडींच्या हातातील हत्यारे- संजय राऊत
-
भविष्यात भाजप-सेना एकत्र येणार का?; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले…
-
“त्याने अजूनही माफी मागितली नाही”; रिद्धीमान साहाचा धमकी देणाऱ्या पत्रकारावर नवा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
