Share

‘महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे’ ?

Published On: 

मुंबई : कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट आली असल्याने दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान, २८ मार्च रोजी होळी आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन सावध झाल्याचं पाहायला मिळालं आहे. याआधीही सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं निदर्शनात आल आहे.

परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत, येणारे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला होळी, धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ठाकरे सरकारने महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सार्वजनिक तसंच खासगी पद्धतीने होळी, रंगपंचमी साजरी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यावर आता भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ‘महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे.

भातखळकर म्हणाले की ‘शब्बे बारातला मर्यादित लोकांच्या उपस्थितीत परवानगी आणि होळीच्या सणाला पूर्णपणे बंदी या ठाकरे सरकारच्या हिंदू विरोधी फतव्याला भारतीय जनता पार्टीचा पूर्ण विरोध आहे. होळी आमच्या श्रद्धेचा आणि भावनेचा प्रश्न आहे. मर्यादित संख्येत उपस्थित राहून आज मुंबईभर होळी प्रत्येकाने आपआपल्या श्रद्धेप्रमाणे साजरी करावी. हे भारतीय जनता पार्टीचे आवाहन आहे. हा आमचा निर्णय आहे आणि हिम्मत असेल तर ठाकरे सरकारने पोलिसांना सांगून आमच्यावर कारवाई करून दाखवावी.’ अस आव्हान भातखळकर यांनी ठाकरे सरकारला दिले आहे.

‘कोरोनाचे नियम पाळू पण होळी मात्र आमच्या परंपरेचा आणि श्रद्धेचा भाग आहे. ती मात्र आम्ही साजरी करणारच हे मी ठाकरे सरकारला सांगू इच्छितो आणि लोकांनाही अवाहन करतो कोरोनाचे नियम पाळून, संख्येची मर्यादा पाळून आपल्या श्रद्धेप्रमाणे जरूर होळी साजरी करा. असे देखील भातखळकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!