Share

“धर्म, जातीतून बाहेर पडल्यानंतर…” ; सोनू सूदची भोंगा प्रकरणावर प्रतिक्रिया

Published On: 

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवर भोंग्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यासह देशात देखील याचे पडसाद पाहायला मिळाले. यानंतर देशात लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसा वादाने खळबळ माजवली आहे. राजकीय वर्तुळात हनुमान चालिसा आणि लाऊडस्पीकरवरून उग्र राजकारण होत आहे. या वादावर प्रत्येकजण आपली बाजू मांडत आहे. आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला सोनू सूद?

“लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसा वादाला लोक आता ज्या प्रकारे एकमेकांच्या विरोधात उभे राहून विष फेकत आहेत, त्याला पाहून माझे हृदय तुटते. गेल्या अडीच वर्षांत आपण सर्वांनी मिळून कोरोनाविरुद्ध लढा दिला. राजकीय पक्षांनीही या साथीच्या खांद्याला खांदा लावून तोंड दिले. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत, जेव्हा सर्व कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज होती, तेव्हा धर्माची पर्वा कोणालाच नव्हती. कोरोनाच्या धोक्याने आपला देश एकत्र आणला होता”.

सोनू सूदचे नेत्यांना आवाहन

सर्व राजकीय पक्षांना आवाहन करत सोनू सूद म्हणाला,  हीच वेळ आहे जेव्हा आपल्याला एका चांगल्या भारतासाठी एकत्र यायचे आहे. धर्म आणि जातीच्या सीमा तोडल्या पाहिजेत. धर्माच्या पलीकडे एकत्र उभे राहिलो तर लाऊडस्पीकरचा वाद आपोआप संपेल. माणुसकी, बंधुता समाजात निर्माण होईल.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!