Share

“बाळासाहेबांची शिकवण आणि पवार साहेबांची सोबत”; संजय राऊत यांचं वक्तव्य

Published On: 

पिंपरी चिंचवड : राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला भोंग्याचा मुद्दा संपण्याचे नाव घेत नाही आहे. सध्या राज्याचं राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. तसेच आगामी महापालिका निवडणूका लक्षात घेता राजकीय नेत्यांच्या सभा सुरु झाल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सध्या पुणे दौरा सुरु आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी आपले विचार मांडले.

माझा आत्मविश्वास तुम्हाला माहीतच आहे इकडची दुनिया तिकडे करू, हे दार नाही तर ते दार, ते दार नाही तर पलीकडचं दार आपण कुठं ही जाऊ, पण शिवाजी आढळराव पाटील संसदेत जाणारच. शिवाजी आढळराव पाटील हे 24 बाय 7 ऍक्टिव्ह असतात. पण शिरूरचे खासदार कधी दिसतात का तुम्हाला असं म्हणत राऊतांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंवर निशाणा साधला.

“मी क्रिकेट खेळत नसलो तरी मला त्यातलं ज्ञान आहे. मला सगळ्या गुगल्या टाकता येतात. कारण मला बाळासाहेबांची शिकवण आहे आणि पवार साहेब सोबतीला आहेत. मला दोन गुरू आहेत त्यामुळे मैदानात बघा”, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. ते पुढे म्हणाले, आता महाविकास आघाडी असल्याने मला काही पथ्य, बंधनं पाळावी लागतायेत. जी माझ्या तत्वात बसत नाहीत, नाहीतर हा राऊत गप बसला असता का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केला.

भोंग्यांच्या मुद्यावर काय म्हणाले संजय राऊत?

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की, ‘भोंग्यांसंदर्भात देशात नक्कीच एक धोरण असायला हवं असं आम्ही आधीही म्हटलं आहे. तसेच गृहमंत्र्यांनी देखील याविषयी राष्ट्रीय धोरण जाहीर करण्याची मागणी केली आहे. यात जाती-धर्माचा प्रश्न येत नाही. परंतु, ज्यांनी मशिदीवरील भोंग्याचा विषय काढला त्याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्रात हिंदू मंदिरांना बसला’. या सर्व गोष्टींचा सर्वात मोठा झटका भजन, कीर्तन करणाऱ्या मंडळांना बसला आहे. खरंतर त्यांना हिंदू समाजातच फूट पाडून आपआपसात दंगली निर्माण करायच्या आहेत. सुदैवाने महाराष्ट्रात असं काही होऊ शकलं नाही.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!