मुंबई : मुंबई येथे भाजपा ओबीसी मोर्चाच्या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार घणाघात केला. यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे सविस्तरपणे..
१) ओबीसी आरक्षणावर गदा आणण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण आम्ही सजग होतो. विविध उपाययोजना केल्याने अनेक ठिकाणी ओबीसींना अधिकचे प्रतिनिधित्व देण्याचे काम आम्ही आमच्या काळात केले.
२) राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिल्यांदा ट्रिपल टेस्टचा मुद्दा आला. पण या सरकारने केवळ वेळकाढू धोरण अवलंबिले. वारंवार न्यायालयात तारखा मागण्याचे काम केले. सर्वपक्षीय बैठकीत मान्य करायचे आणि नंतर काहीच करायचे नाही, हेच त्यांचे धोरण राहिले.
३) मा. सर्वोच्च न्यायालयाने वारंवार एम्पिरिकल डेटा सांगितले तरी जनगणनेचा डेटा की एम्पिरिकल डेटा यातच महाविकास आघाडी सरकारने घोळ घातला. राज्य मागासवर्ग आयोगाने 1 महिन्यात अहवाल तयार करण्याची दर्शविली, पण राज्य सरकारने त्यांना सुविधाच दिल्या नाही.
4) अखेर राज्य मागासवर्ग आयोगाला शेवटी स्वतंत्र प्रसिद्धी पत्रक काढून खुलासा करावा लागला. यांनी कोर्टात काय सांगितले, अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर दिला, म्हणून तो ग्राह्य धरा. या सरकारने केवळ आणि केवळ ओबीसींचा विश्वासघात केला आहे.
५) ओबीसी आरक्षण पुन्हा परत मिळत नाही, तोवर भाजपचा संघर्ष थांबणार नाही. आगामी काळात ज्या कोणत्या निवडणुका होतील, त्यात 27 टक्के उमेदवारी ही ओबीसींना देण्याचा आमचा निर्धार पक्का आहे. तशी घोषणा आम्ही पूर्वीच केली आहे.
६) यांच्यासमोर कोणतीही समस्या आली, की केंद्र सरकारकडे बोट दाखवितात. सारेच जर केंद्राने करायचे तर सरकार चालवायला सुद्धा केंद्रालाच सांगा. तुम्ही काय फक्त वसुलीसाठी सरकार बनविले का?
७) या महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या मालकांना ओबीसी आरक्षण नको आहे. त्यामुळे आता निर्वाणीच्या संघर्षाची वेळ आली आहे. जोवर ओबीसी आरक्षण मिळत नाही, तोवर आमचा हा संघर्ष सुरूच राहील.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

