कऱ्हाड – कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः आयकर विभागाच्या या नोटिसबद्दल माहिती दिली आहे. तसेच 21 दिवसांत या नोटीसला उत्तर द्यावं लागणार असल्याचंही चव्हाण यांनी सांगितले आहे.
‘आयकर विभागानं नोटीशीमध्ये गेल्या १० वर्षांच्या विवरणाची मागणी केली आहे. त्यासोबतच येत्या २१ दिवसांत या नोटिशीला उत्तर द्यायला सांगण्यात आलं असून प्रत्यक्ष देखील हजर राहण्याचे निर्देश नोटिशीमध्ये देण्यात आले आहेत. त्या दृष्टीने आम्ही योग्य ती कार्यवाही करत आहोत. या नोटिशीला सविस्तर उत्तर दिलं जाईल’, असं चव्हाण म्हणाले आहेत. मात्र, त्यासोबतच त्यांनी भाजपवर निशाणा देखील साधला आहे.
‘आपल्याकडे असलेल्या सत्तेचा वापर कुणासाठी कसा करायचा याची भाजपची व्यूहरचना आहे. त्याच आधारावर हे सगळं घडत आहे. शरद पवारांना देखील अशीच नोटीस पाठवली होती, आता मलाही अशीच नोटीस पाठवली आहे’, असं चव्हाण यावेळी म्हणाले.
दरम्यान, कऱ्हाड येथील त्यांच्या निवासस्थानी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, ‘बिहारची निवडणूक खरंतर जिंकता आली असती. मात्र, काँग्रेस पक्षाची तेथे अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली आहे. यावर मी भाष्य करणे उचित नाही. मात्र, यावर चर्चा लवकर व्हावी, अशी अपेक्षा आहे .
महत्वाच्या बातम्या
- मंत्री गुलाबराव पाटील ‘या’ नवसाची पूर्ती करण्यासाठी आले शिर्डीच्या साई दरबारी!
- ‘राजाचा जीव पोपटात, तर काहींचा जीव मुंबई महापालिकेत आहे’
- ती’ नटी भाजपचीच कार्यकर्ती; नाव न घेता कंगणावर राऊतांचा हल्लाबोल
- वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर जनतेला दिलासा देण्यासाठी रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल : मनसे
- अनुदानाच्या श्रेयासाठी पाथर्डी तालुक्यात राष्ट्रवादी-भाजप-शिवसेनेत रस्सीखेच!


