Share

17 जूनपासून रिलायन्स जिओची नवी योजना; राऊटर मिळणार फ्री

Published On: 

मुंबई : रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना घेऊन असतात. जेणेकरून त्याचा फायदा जिओ ग्राहकांना मिळू शकेल. यातच आता रिलायन्स जिओ फायबर वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन पोस्टपेड योजना आणल्या आहेत. या योजना दरमहा 399 रुपयांपासून सुरू होतील. नवीन योजना सुरू करण्याबरोबरच कंपनीने जाहीर केले आहे की सर्व नवीन वापरकर्त्यांना योजनेसह इंटरनेट बॉक्स म्हणजेच राऊटर मोफत मिळणार आहे. यामुळे याचा नक्कीच ग्राहकांना फायदा होणारा आहे.

विशेष म्हणजे यासाठी ग्राहकांना कोणतेही इन्स्टॉलेशन फी भरावे लागणार नाही. यामुळे ग्राहकांची 1500 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.  मात्र यासाठी वापरकर्त्यांना किमान 6 महिन्यांच्या वैधतेची योजना विकत घेतली तरच विनामूल्य इंटरनेट बॉक्स आणि विनामूल्य स्थापनेचा लाभ मिळू शकणारा आहे. ही सर्व योजना 17 जूनपासून लागू करण्यात येणार आहे.

ग्राहकांना रिलायन्स जिओच्या 999 रुपयांच्या पोस्टपेड जियोफायबर कनेक्शनमुळे विनामूल्य ओटीटी अॅलप्सचा लाभही मिळणार आहे. 1499 योजनेत नेटफ्लिक्ससह सर्व 15 ओटीटी अॅप्स समाविष्ट असतील. या अॅरप्सचे बाजार मूल्य 999 रुपये आहे. ओटीटी अॅप्स चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी 1000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट घेऊन ही कंपनी ग्राहकांना विनामूल्य 4K सेट टॉप बॉक्सची मोफत  सुविधा देणार आहे.

रिलायन्स जिओच्या नव्या पोस्टपेड योजनेचे मुख्य आकर्षण म्हणजे तेच अपलोड आणि डाऊनलोड स्पीड मिळणार आहे. वापरकर्त्यांना 399 रुपयांच्या योजनेत 30 एमबी, 699 रुपयांच्या योजनेत 100 एमबी, 999 रुपयांच्या योजनेत 150 एमबी आणि 1499 रुपयांच्या योजनेत 300 एमबी अपलोड आणि डाउनलोड स्पीड मिळेल. याशिवाय जिओफायबरवर 1 जीबीपीएस पर्यंतची योजना देखील उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!