कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली होती. 6 जून रोजी रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजेंनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. येत्या 16 जूनपासून कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होईल असं संभाजीराजे म्हणाले होते. आज सकाळी 11 वाजता शाहू महाराजांच्या समाधी स्थळी या आंदोलनाला सुरुवात झाली होती.
कोल्हापुरातील या मूक मोर्चात राज्यभरातील मराठा समन्वयक सहभागी झाले आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही आंदोलनाला हजर होते. यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी सवांद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच भूमिका न घेतल्याने मराठा आरक्षण गेलं. त्याला दोन्ही सरकारे दोषी आहेत,’ असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
‘मराठा आरक्षणाचा प्रश्न हा गरीब मराठा विरुद्ध श्रीमंत मराठा असा आहे. मी ही भूमिका घेतली होती. ती पटवून देण्याचा प्रयत्नही केला होता. आता ही भूमिका सगळ्यांना पटत आहे. ही चांगली गोष्ट आहे, असं ते म्हणाले. मराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने आधीपासूनच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे त्यांनी आता तरी मराठा आरक्षणासाठी जे जे पर्याय आहेत, त्याचा अवलंब केला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
आजच्या मराठा आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहेच. शिवाय ओबीसी आणि पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्नही सरकारने सोडवला पाहिजे.’ अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. तसेच ‘दोराय स्वामींचं जजमेंट आहे. त्याला रिव्हिजीट करण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलली पाहिजे, असं सांगतानाच मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षण रद्द होण्यास केंद्र आणि राज्य सरकार कारणीभूत आहे. दोन्ही सरकारांनी वेळीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे हा प्रश्न उद्भवला.’ असा आरोप देखील त्यांनी यावेळी बोलताना केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अक्षयच्या ‘बेल बॉटम’ चित्रपटाच्या प्रदर्शानाची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी होणार रिलीज
- ‘…म्हणून मी एकटा चर्चेसाठी मुंबईला जाणार नाही’ – खासदार संभाजीराजे
- एकटा संभाजी काय करणार ?, त्याच्या मागे 48 खासदारांनी दिल्लीत ताकद लावावी – शाहू महाराज
- ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परवा भेटायला जाणार’ ; संभाजीराजेंची माहिती
- “मेरे रश्के कमर” या गाण्यामुळे सोनू कक्कर होतेय ट्रोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
