Share

‘सत्तर वर्षांहून अधिक वयांच्या कैद्यांची सुटका करा’, मेधा पाटकरांची हायकोर्टात याचिका

Published On: 

मुंबई : देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असून दरदिवशी ६० ते ६५ हजार रुग्णांची नोंद होत आहे. याच पार्श्वभूमीवर ७० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या कैद्यांची अंतरिम जामीन किंवा आपत्कालीन पॅरोलवर सुटका करण्याचे निर्देश केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना द्यावेत, अशी मागणी मेधा पाटकर यांनी जनहित याचिकेत केली आहे.

याचिकेत म्हटले की, कैद्यांच्या सुटकेचे निकष ठरवण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचे निर्देश गेल्या वर्षी दिले होते. मात्र, ही समिती मृत्युदर जास्त असलेल्या कैद्यांच्या वृद्धावस्थेचा विचार न करता कायदा व सुव्यवस्था यांचा विचार करत आहे. तसेच उच्चाधिकार समितीचे निकष देशभर समान असायला हवे आहेत.

कारागृहे क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांनी भरलेली

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार ६४ टक्के कोरोना रुग्ण हे २५ ते ६४ वर्षे वयोगटातील आहेत. २० वर्षे वयोगटातील व्यक्तींपेक्षा ७० वर्षे वयोगटातील व्यक्तींची रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता ही वीसपट अधिक असते. तसेच ८८ टक्के मृत्यू हे ज्येष्ठ नागरिकांचे झाल्याचा लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या अभ्यासाचा हवाला मेधा पाटकर यांनी याचिकेत दिला. कारागृहे क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांनी भरलेली आहेत. यामुळे वृद्ध कैदी संसर्गाला बळी पडण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!