Share

‘ब्रूक फार्मा कंपनीच्या गुजराती व्यापाऱ्याचा फडणवीसांना एवढा पूळका का ?’

Published On: 

बीड : महाराष्ट्रात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यावरुन राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड्स, इतर औषधे उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असतानाच राज्यातील राजकारण चांगलच पेटलं आहे.

आता हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक फार्मा या कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले होते. हे समजताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

यावेळी पोलीस आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाल्याचे देखील समजत आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रेखा फड यांनी देखील देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. ‘रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सचा 60हजाराहून अधिक साठा बाळगणाऱ्या ब्रूक फार्मा कंपनीच्या गुजराती व्यापाऱ्याचा फडणवीस यांना एवढा पूळका का ?’ असा सवाल त्यांनी केला आहे.

‘राज्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा त्यामूळे कित्येक पेशंटचे प्राण गेले आहेत. विरोधी पक्षाने यात सहकार्य करायचे इंजेक्शनची साठेबाजी करणाऱ्या फार्मा कंपनीच्या गुजराती व्यापाऱ्याला पोलिसांनी अटक केली असता देवेंद्र फडणवीस पोलिसांना जाब विचारतात ? कुठला रडीचा डाव खेळता ?? महाराष्ट्रातील जनतेच्या जीवावर सत्ता आणता आणि त्यांच्या जीवाची काळजी घ्यायची सोडून गुजराती व्यापाऱ्याला सहकार्य करता ?? लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला ? राज्यातील जनता सुज्ञ आहे. राज्यावर आज वाईट वेळ आहे. पण राज्यातील साडे बारा कोटी जनतेने तुमचा ‘रंग माझा वेगळा’ हे नाट्य पाहिलंय हे लक्षात असू द्या. तुम्हाला गुजरातच्या ओटीत टाकायची आता खरी वेळ आलीय, आणि हे महत्वाचं काम राज्यातली जनताचं करेल !,’ असा घणाघात रेखा फड यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!