मुंबई : २०१९ विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेनं साथ सोडल्यामुळे भाजपला सर्वाधिक जागा येऊन देखील विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. तर, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर, कोरोना, वादळ, अतिवृष्टी, भ्रष्टाचार अशा विविध आरोपांवरून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची कोंडी केल्याचे दिसून आले आहे.
कोरोना काळात देखील मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती हाताळण्यास महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. दरम्यान, फडणवीसांवर टीका करताना शिवसेना आमदाराचा तोल घसरल्याचे समोर आले आहे.
‘मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते,’ असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. यासोबतच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा देखील एकेरी उल्लेख करत त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांबच राहिले..
हे या गायकवाडला कोण सांगेल..
पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू..
जंतू पार्सल पाठवतो मातोश्री वर..
कुठे घालायची तिथे घाल..— Nitesh Rane (@NiteshNRane) April 18, 2021
संजय गायकवाड यांच्या टीकेला भाजप आमदार नितेश राणे यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. ‘देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांबच राहिले.. हे या गायकवाडला कोण सांगेल.. पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू.. जंतू पार्सल पाठवतो मातोश्री वर.. कुठे घालायची तिथे घाल..’ असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- …तरी महाराष्ट्र लढेल आणि जिंकेल ! जितेंद्र आव्हाडांची केंद्राला चपराक
- स्थानिक प्रशासनानं नागरिकांबद्दल संवेदनशील राहणं आवश्यक – मोदी
- मे मध्ये देखील कडक निर्बंध लागू राहणार ? राजेश टोपेंच सूचक विधान
- शेतकऱ्यांचे हाल! लॉकडाऊनमुळे बाजार समितीमध्ये आवक घटली
- “स्व.बाळासाहेबांच्याच शब्दात बोलायचं तर हे ‘येड#$%’ सरकार आहे”; नितेश राणेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

