Share

…तरी महाराष्ट्र लढेल आणि जिंकेल ! जितेंद्र आव्हाडांची केंद्राला चपराक

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्य सेवेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन व इतर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कलम १४४ म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने पुरेशा ऑक्सिजनची इतर राज्यातून उपलब्धता करून देण्यासोबतच रेमडेसिविर इंजेक्शन व कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी अधिक लसींचा पुरवठा करावा, अशी विनंती राज्य सरकारने केली आहे. तसेच, लस, रेमडेसिविर इंजेक्शन यांच्या पुरवठाबाबत महाराष्ट्राशी दुजाभाव केला जात असल्याचा आरोप देखील महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी केला आहे.

दरम्यान, शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोरोना प्रभावित ११ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांचा आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील उपस्थित होते. यावेळी, आरोग्यमंत्र्यांनी कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटर्स वाटपाची माहिती दिली. या बातमीची लिंक शेअर करत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राशी दुजाभाव करण्यात आलेली आकडेवारी ट्विट केली आहे.

‘सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रास 1121 व्हेंटीलेटर्स, 1700 उत्तरप्रदेशला, 1500 झारखंडला, 1600 गुजरातला, 152 मध्यप्रदेशला आणि 230 छत्तिसगढला – डॉ. हर्षवर्धन यांची माहिती…तरी महाराष्ट्र लढेल आणि जिंकेल…जय महाराष्ट्र,’ असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!