बीड : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी आज व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दिपालीला एक उच्चपदस्त वन अधिकारी नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. दोन-चार दिवसांपूर्वी ते अधिकारी येऊन गेले, त्यावेळी दिपाली चव्हाण यांना त्यांनी झापल्याची माहिती आहे.
दिपाली यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टाकला जाणारा दबाव व मानसिक त्रासाला कंटाळून दिपाली यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.दीपाली चव्हाण यांनी स्थानिक खासदार नवनीत राणा यांच्याकडे दाद मागितली होती असं देखील या नोटमधून समोर आलं आहे. तर राणा यांनी देखील एका दीपाली चव्हाणने या प्रकरणाची सगळी माहिती आपल्या दिली असल्याचे सांगितले आहे.
याच मुद्द्यावरून आता खासदार नवनीत राणा यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रेखा फड यांनी नवनीत राणा यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘खासदार नवनीत राणा जी दिपालीने एक महिला म्हणून आपल्याकडे तक्रार केली होती. एवढंच नाही तर तो भ्रष्ट अधिकारी DCF शिवकुमार दिपालीला फोनवर अशील्ल भाषेत बोललेली रेकॉर्डिंग आपणांस ऐकवली होती. त्याच वेळी राणा बाई आपण त्यांच्या तक्रारीची दखल घेतली असती तर आज दिपाली जिवंत असली असती’. असा घणाघात रेखा फड यांनी केला आहे.
https://twitter.com/RekhaPhadSpeaks/status/1375557073543471105?s=20
तर, ‘जेवढे ते दोन भ्रष्ट अधिकारी दिपालीच्या मृत्युला नव्हे तर हत्त्येला जवाबदार आहेत, तितक्याच अप्रत्यक्ष रित्या आपण सुद्धा जवाबदार आहात. जेव्हा वनपरिक्षेत्र अधिकारी RFO दिपाली चव्हाण भेटल्या तेव्हाच त्यांना मदत करन अपेक्षित होत, आता हे ‘मगरमच्छ के आसू’ काय कामाचे’ ? असा टोला रेखा फड यांनी राणा यांना लगावला आहे.
https://twitter.com/RekhaPhadSpeaks/status/1375557909992497161?s=20
महत्वाच्या बातम्या
- सरकारचा जीव फक्त मुंबईत असेल तर आता मुंबईला जाणारी लाईन तोडू – पूजा मोरे
- सुखावह! औरंगाबादला मिळाला दहा हजार लसींचा साठा
- सामाजिक समन्यायासाठी जिल्हा नियोजनाची गरज – डॉ. जे. एफ. पाटील
- जागतिक रंगभूमी दिन! शहर ‘लॉक’ अन नाटके ‘डाऊन’
- एनआयएच्या चौकशीमुळे वाझेंचे बोलविते धनी चिंतेत ; फडणवीसांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

