Share

IPL 2022 : रिकी पाँटिंगनं मोडले टीव्हीचे तीन-चार रिमोट; पण नक्की घडलं काय? वाचा एका क्लिकवर!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाची कामगिरी काही विशेष झाली नाही. सात सामन्यांत चार पराभव आणि तीन विजयांसह संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. संघाचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याचे मत आहे, की त्यांच्या संघाला विजयी मार्गावर परतण्यासाठी फक्त गतीची गरज आहे. क्वारंटाइनमधून बाहेर आल्यानंतर पाँटिंगने अनेक विषयांवर चर्चा केली. राजस्थानविरुद्धचा सामना बंद खोलीत पाहताना तीन ते चार टीव्हीचे रिमोट तोडल्याचे त्याने सांगितले. याशिवाय अनेक पाण्याच्या बाटल्याही त्याने भिंतीवर फेकल्या.

पाँटिंगने असेही सांगितले, की त्यांचा संघ एका सामन्यात ३६ ते ३७व्या षटकांपर्यंत चांगला खेळतो, परंतु संपूर्ण सामना तीन ते चार षटकांत हरतो. याच कारणामुळे त्याच्या संघाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्याचवेळी पाँटिंगने उत्तरार्धात आपल्या खेळाडूंना विजयासाठी जास्त टेन्शन घेऊ नका, असा इशारा दिला.

https://twitter.com/DelhiCapitals/status/1519171983069437952

रिकी पाँटिंग म्हणाला, “मला माहीत आहे की आम्ही परतीच्या मार्गावर येण्याच्या खूप जवळ आहोत. आम्हाला स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. आम्हाला सकारात्मक राहण्याची गरज आहे. आम्ही संयमाने कामे करणार आहोत, जे आम्ही आत्तापर्यंत करत आलो आहोत आणि निकाल आपोआप आमच्या बाजूने येतील. आमचा संघ इतका चांगला आहे की निकाल आमच्या बाजूनेच लागला पाहिजे.”

पाँटिंगने सांगितले, की दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील सामना एका खोलीत पाहणे त्याच्यासाठी खूप त्रासदायक होते. पाच दिवसांनंतर खोलीतून बाहेर आलेल्या पाँटिंगने सांगितले, की यावेळी त्याने तीन-चार रिमोट तोडले आणि अनेक पाण्याच्या बाटल्या भिंतीवर फेकल्या. तो म्हणाला, “तुम्ही प्रशिक्षक असताना हे खूप अवघड असते, पण गोष्टी तुमच्या नियंत्रणात नसतात.”

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!