Share

IPL 2022 : जबरदस्त..! मुंबईविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसननं ठोकलं द्विशतक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२मध्ये आज डबल हेडरचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स (RR vs MI) यांच्यात नवी मुंबईतील डी. वाय. पाटील क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना जितका महत्त्वाचा आहे, तितकाच महत्त्वाचा राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनसाठीही आहे. संजूने या या सामन्यात मैदानात उतरताच द्विशतक झळकावले आहे. संजूचा हा टी-२० क्रिकेटमधील २००वा सामना आहे.

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२२ची धमाकेदार सुरुवात केली. राजस्थानने पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा ६१ धावांनी पराभव केला होता. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना २१० धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसनने या सामन्यात २०३च्या स्ट्राईक रेटने केवळ २७ चेंडूत ५५ धावा केल्या. या खेळीत त्याने ५ षटकार आणि ३ चौकार लगावले.

या सामन्यापूर्वी संजूने टी-२० क्रिकेटमध्ये ३ शतके आणि ३१ अर्धशतके केली आहेत. संजूने ही तिन्ही शतके आयपीएलमध्येच झळकावली आहेत. त्याने लीगमध्ये १६ अर्धशतकही केले आहेत. त्याने आयपीएलच्या १२२ सामन्यांमध्ये ३१२३ धावा केल्या आहेत. त्याने टी-२० मध्ये २११ षटकार आणि ३८३ चौकार मारले आहेत. मुंबईविरुद्धचा हा त्याचा १२३ वा आयपीएल सामना असेल. महेंद्रसिंह धोनीने सर्वाधिक २२२ आयपीएल सामने खेळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!