मुंबई : सुभाष घई यांनी आपल्या एका नव्या मराठी चित्रपटाची गुढीपाडव्याच्या निमित्ताने घोषणा केली आहे. लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव ‘माय डॅड्स वेडिंग’ आहे. नुकतेच त्यांनी या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीलाही सर्वोत्तम कलाकृती देणाऱ्या शोमॅन सुभाष घई यांनी आपल्या आणखी एका नव्या मराठी चित्रपटाची गुढीपाडव्याच्या निमित्ताने घोषणा केली आहे. लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव ‘माय डॅड्स वेडिंग’ आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे.
सध्या तरी या चित्रपटातील कलाकार गुलदस्त्यात असून या चित्रपटाचे चित्रीकरण लंडन येथे होणार आहे. नावावरूनच या चित्रपटात काहीतरी भन्नाट असणार, हे कळतेय. यापूर्वीही विजय गुप्ते यांनी चित्रपटांत वेगवेगळे विषय हाताळले आहेत. त्यामुळे ‘माय डॅड्स वेडिंग’ या चित्रपटातही काहीतरी नवीन संकल्पना असणार, हे नक्की. ‘माय डॅड्स वेडिंग’ हा बहुभाषिक चित्रपट असून यात मराठी आणि इंग्रजी भाषा प्रामुख्याने ऐकायला मिळणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :


