पुणे : मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मंगळवारी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ दिला आहे. पुणे जिल्ह्यात मंगळवारी संपूर्ण ढगाळ वातावरण राहील. तसेच, पुढील दोन दिवस पुणे शहरासह घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढणार असून त्यानंतर तो कमी होईल, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले.
भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्यपि म्हणाले, पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहे.
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात, तसेच ओरिसाच्या किनारपट्टीवर उत्तरेत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मॉन्सून सक्रिय झाला आहे.”
महत्वाच्या बातम्या
- कंगना राणावत नंतर आता आठवलेंचा पायल घोषलाही पाठिंबा
- दुःखद: ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनाने निधन!
- #खुशखबर_: उद्यापासून कोव्हिड लसीच्या तिसऱ्या मानवी चाचणीला सुरुवात
- मोठी बातमी: मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका
- राज्य सरकारचा मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर वैध ठरवण्याचा प्रयत्न – अशोक चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

