Share

कंगना राणावत नंतर आता आठवलेंचा पायल घोषलाही पाठिंबा

Published On: 

मुंबई : अभिनेत्री पायल घोष यांनी सिने निर्माता अनुराग कश्यप यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची सखोल चौकशी करून त्वरित त्यांना मुंबई पोलिसांनी अटक करायला पाहिजे होते मात्र आद्याप तशी कारवाई झालेली नाही. याप्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करून कंगना राणावत प्रमाणे अभिनेत्री पायल घोष यांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून पायल यांनी घाबरू नये असे अश्वासन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पायल घोष यांना दिले.

आज अभिनेत्री पायल घोष यांच्याशी दूरध्वनीद्वारे ना रामदास आठवले यांनी चर्चा केली. लवकरच रामदास आठवले पायाल घोष यांची भेट घेणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

बॉलिवूड मध्ये स्ट्रगलर्स असणाऱ्या कलाकारांचा निर्मात्यांनी दुग्दर्शकांनी गैरफायदा घेण्याचे काही ठिकाणी प्रकार होत असतील तर ते रोखण्यासाठी अभिनेत्री पायल घोष यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. हिंदी सिनेसृष्टीत काही प्रमाणात होत असलेले गैरप्रकार या चौकशीमुळे थांबतील असे ना रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!