Share

दुःखद: ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनाने निधन!

Published On: 

सातारा : सोनी मराठी चॅनेलवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेतील कलाकारांना कोरोनाचा विळखा बसला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती अचानक खालावली होती. आज ७९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

वाबगावकर यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांना साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऑक्सिजनची पातळी खालावल्याने त्यांचे पहाटे ४.३० च्या सुमारास निधन झाले आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. आशालता वाबगावकर यांनी आतापर्यंत मराठी आणि हिंदी अशा जवळपास १०० चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

सोनी मराठी चॅनेलवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत त्यांची भूमिका असून साताऱ्यात शूटिंग सुरु असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. या मालिकेतील २७ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यात १६ कलाकार आणि इतर क्रू मेंबर्सचा समावेश आहे. राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आल्यानंतर शूटिंगला परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता शूटिंग दरम्यान कलाकारांना कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!