पुणे : गेले ६ महिने देशासह राज्यात कोरोनाने कहर घातला आहे.या रोगामुळे लाखो नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसवरील लसींवर आता संशोधकांना मोठं यश प्राप्त होत आहे. याआधी कोरोना लस बाजारात येण्याच्या अनेक अफवा पसरल्या होत्या.
युकेमधील लसीमध्ये काही अडचण आल्याने देशात सिरम संस्थेने देखील या लसीवरील चाचणीस थांबवले होते. आता आरोग्य विभागाने हिरवा कंदील दिल्याने या कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीस सुरुवात झाली आहे. यासाठी देशभरातून हजारो स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला असून यातील काही ठराविक स्वयंसेवकांना सर्व चाचण्या व नियमांच्या पूर्ततेनंतर या टप्प्यातील मानवी चाचणी करण्यात येईल.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/627041657956360/
महत्वाच्या बातम्या :
- मोठी बातमी : ‘आई माझी काळुबाई’ मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री वाबगावकर व्हेंटिलेटरवर! तर तब्बल २७ जणांना कोरोनाचा विळखा
- पारनेरमध्ये कांद्याला प्रति क्विंटल ५ हजार १०० रुपयांचा भाव
- मराठा आरक्षणाला दिला ‘या’ खासदारांनी पाठिंबा!
- संसदेत गुंडागर्दी करणाऱ्या खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचा कायदा करा: केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
- मोठी बातमी: मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका


